ज्ञानेशांचा संदेश
by Satguru Shri Wamanrao Pai
हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींचा आकाराने छोटा पण शक्तीने मोठा असा अलौकिक ग्रंथ आहे. चांगदेव पासष्टी, ज्ञाने्वरी व अनुभवामृत या माऊलींच्या तीन ग्रंथांचा सुरेख त्रिवेणी संगम हरिपाठात झाला आहे. नामस्मरणाने नामधारकाला काय काय गोड फळे प्राप्त होतात व परमार्थ शिखरावर तो कसा सहज पोहोचतो याचे रसाळ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठांत केले आहे. हरिपाठाचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत लोकांना सहज समजेल असा, परमपूज्य सदगुरु श्री. वामनराव पै यांनी या पुस्तकात सांगितला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हरिपाठातील अभंगांचा भावार्थ वाचकांना सुस्पष्ट होईल व हरिपाठाची व हरिनामाची गोडी लागेल.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers